मुसळधार पावसाची सर बनून ती धावत येते, रेडकोटचा अडथळा हळूवार हाताने बाजूला सारत चिंब भीजवून टाकते.
आणि
मग निघूनही जाताते ओहोटीचे पाणी बनून, ज्या आवेगाने येते त्याच वेगाने. सोबत किनाऱ्यावरच्या वाळूचे स्वत:चे असते ते असे सर्व काही,घेवून जाते. आधीपासून किनाऱ्यावर उमटलेल्या नक्षीदार पाऊलखुणा उध्वस्त करत. पाणीच ते निःसंग, रंगहीन. समर्पित होणे आणि मुक्त होवून जाणे पाणीच जाणे.
जमीन मात्र होता होईतो अंतरंगात आठवणी जपत राहते, पृष्ठभागावर रुक्षतेचा मुखवटा पांघरुन.
Comments
Post a Comment