Skip to main content

राष्ट्रीय विज्ञान दिन

२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. चेंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या कर्तबगारीला सलाम करण्यासाठी गेली कित्येक वर्ष म्हणजे १९८७ पासून विज्ञान दिन साजरा केला जात असला तरी सोशल मिडीयाच्या ताकदीने सर्वसामन्य लोक या दिवसाशी जोडली गेली.
         २८ फेब्रुवारी १९२८ याच दिवशी रमण यांंनी आपला शोध निबंध प्रसिद्ध केला.
         रामन इफेक्ट म्हणजे काय ?
         आपण दिवाळीत बघतो, घराबाहेर फटक्यातील बॉंबचा जोरदार स्फोट झाला की घरातील लहान मोठी भांडी कंप पावतात व त्यांचा नाद आवाज येतो,हा आवाजाचा परिणाम. पदार्थातील रेणू अत्यंत संवेदनशील असतात,प्रकाशाला कंपने असतात. वस्तूवर प्रकाश झोत पडला की तर वस्तूतील रेणू कंप पावते, क्षणानंतर ती कंपने आत घेतलेला प्रकाश परत बाहेर टाकतात,प्रकाशाचे विकिरीण करतात, निमिषार्धात होणाऱ्या या प्रकाशाच्या विकिरणांचे संशोधन रमण यांनी केले हाच रामण इफेक्ट.
         प्रत्येक पदार्थातून प्रकाशाचे विकिरण होण्याचे प्रमाण वेगवेगळे असते.
         गेल्याच वर्षी विज्ञान दिनाच्याच दिवशी एक वाक्य ऐकले होते, भारतीयांना जी नोबल मिळाली त्यातील कोणतेही संशोधन लोकांसाठी उपयोगाचे नाही,ते निव्वळ सिद्धांतीक संशोधन आहे.
         रामन इफेक्टचा उपयोग कुठे कुठे होतो हे वाचले तर वरील वाक्य अज्ञानातून किंवा आपल्याच देशबांधवांना कमी लेखण्यातून केले गेलेय हे समजू शकेल.
         एखाद्या पदार्थातील घटक त्या पदार्थाची मोडतोड न करता करणे या मुळे शक्य झाले.
         फळं,भाजीपाला यातील किटकनाशकांची उपस्थिती,प्रमाण आणि प्रकार ओळखणे या मुळे शक्य झाले. पेट्रोलमधील भेसळ ओळखण्यासाठी सुद्धा याच संशोधनाचा वापर केला जातो.
          संशोधक म्हणजे एकतर रुक्ष किंवा बावळट असे चित्र आपल्या समोर रंगवले जाते. १९३० साली रमण यांनी नोबेल पारितोषिक स्विकारले. तेव्हा त्यांनी आपला प्रयोग तिथे करुन दाखवला,त्यासाठी अल्कोहोलचा वापर केला. त्यारात्री त्यांचे यश साजरे करण्यासाठी पार्टी आयोजित करण्यात आली होती, भोजनाच्या वेळी रमण यांनी कोणतेही मद्य घेण्यास नकार दिला,तेव्हा उपस्थित एका वैज्ञानिकाने एक खुसखुशीत विधान केले,  "सकाळी आम्ही अल्कोहोलवर रामन परिणाम बघितला तेव्हा संध्याकाळी रामन यांच्यावर अल्कोहोलचा परिणाम बघायला मिळेल असे वाटले होते".
          गुरुत्वाकर्षणाचा शोध सफरचंद झाडावर पडण्यावरुन लागला तसेच रमण यांनी बोटीतून येताना निळे आकाश बघितले आणि आकाश निळे का दिसते ? या मनात उठलेल्या साध्याशा प्रश्नामुळे रामन इफेक्ट सारखा नोबल विजेता शोध लागला.
संदर्भ :- मराठी विज्ञान परिषद पुणे
निरंजन घाटे यांचा लेख
          

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४