नदीला आस लागलेली असते, सुर्याला जावून मिळावे, त्याच्या डोळ्यातील अश्रू बनून त्याच्या सान्निध्यात राहावे.
तप्त सूर्याच्या कल्पनेनीसुद्धा नदीची वाफ होवून आसमंतात हरवून जाते.
वाहत जाणे हा नदीचा धर्म, तप्त उन्हापासून तीला जपणे हा तीच्या आसपासच्या हिरवळीचा धर्म, सागराला मिळून एकरुप होणे हेच नदीचे प्राक्तन.
सरिता सागराला मिळते तेव्हाच ती पुन्हा पुन्हा जन्म घेते.
नदीला अकाली सुकू देण्यापासून थांबवणे तीच्या अजूबाजूच्या हिरव्या निसर्गावर अवलंबून असते तेवढेच आपल्या फायद्यासाठी तिला ओरबडणाऱ्यांच्या मनोवृत्तीवर पण. नदी योग्य वेळी, योग्य प्रकारे सागराला जावून मिळणे यातच खरे हित सामावलेले असते.
Comments
Post a Comment