Skip to main content

Posts

Showing posts from March, 2026

पंखांमधले बळ

नाही मिळत कोठे उसने पंखामधले बळ ठेव पाय भुईवर आणि भर कवेत आभाळ नाही देत कोणा कोणी फुकटची साऊली बांध घरटे उबेत आणि हो जगाची माऊली. नाही देत कोणी फुका ज्ञानाचा प्रकाश हो सावित्रीची लेक आणि धर पुस्तकांचा ध्यास. नाही उगाच दरवळत जीवनाचे चंदन मान ठेव श्रमांचा आणि कर सत्याला वंदन. नाही मिळत सहज कुणाला कीर्तीचे ते धन जप ध्येय मनाशी आणि कर परिश्रम साधन. नाही घालत उगाच गळ्यामध्ये यश किर्तीचा हार ठेव जिद्द मनामध्ये आणि घाल अंधारावर वार. --- अभय बापट ०८/०३/२०२६

अंतर

तू निळ्या नभाचा राजा मी निष्पर्ण धरेची राणी तुझ्या माझ्या सोबतीचा करार लिहिला कोणी. कोणी लिहिली माथी सटवाईची अदृष्य लिपी नकळत जोडून जातात ही जन्मभराची नाती. ही ओढ कुठूनी येते अलवार रंग गंधाची पटवून ओळख देते खूण जन्म जन्माची. पैलतीरावरुन येतो पाव्याचा नाजूक सूर पुन्हा पावले माझी जातात निघून दूर तू कृष्ण होतास तेव्हा मीच होते का रे राधा नावाविना नात्याची का मलाच होते बाधा. -----अभय बापट २९/०३/२०२६

बळ पंखातले

नाही मिळत कोठे उसने पंखामधले बळ ठेव पाय भुईवर आणि भर कवेत आभाळ नाही देत कोणा कोणी फुकटची साऊली बांध घरटे उबेत आणि हो जगाची माऊली. नाही देत कोणी फुका ज्ञानाचा प्रकाश हो सावित्रीची लेक आणि धर पुस्तकांचा ध्यास. नाही उगाच दरवळत जीवनाचे चंदन मान ठेव श्रमांचा आणि कर सत्याला वंदन. नाही मिळत सहज कुणाला कीर्तीचे ते धन जप ध्येय मनाशी आणि कर परिश्रम साधन. नाही घालत उगाच गळ्यामध्ये यश किर्तीचा हार ठेव जिद्द मनामध्ये आणि घाल अंधारावर वार. --- अभय बापट ०८/०३/२०२६

स्त्रीचा सन्मान हाच संस्कृतीचा अभिमान

समजतंय का तुला,            भारतात या हिंदूस्थानात जन्म घेतलास हे तुझे सौभाग्यच. नाही, हे नेहमीसारखे गुळगुळीत वाक्य नाही‌.           जगातील प्रत्येक स्त्रीला स्वत:चा हक्क, मानसन्मान मिळवण्यासाठी लढावे लागले हे खरे पण हिंदूस्थानातील परिस्थिती सगळ्या जगापेक्षा वेगळी होती.            "जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे देवता वास करतात", या शब्दात स्त्रीयांना सन्मान आपल्या संस्कृतीत दिला गेला.              हिंदूस्थानी संस्कृत ऐहिक सुखासाठी आवश्यूअसलेल्या विद्या,धन आणि शक्ती या तिन्हींची देवता म्हणून सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना मान दिलेला आहे.              नंतर हा मान सन्मान हरवत गेला तरी भारतीय स्त्रीसाठी हे सोनेरी शिखर कायमच मार्गदर्शन करत होते.ध्येय माहिती होते, मार्ग माहीती होता,त्या काट्याकुट्यातून रस्ता काढणे एवढाच संघर्ष भारतीय स्त्रीला करावा लागला, तिथेही त्यांच्यासाठी सुविचारी पुरुषांची साथ मिळत होतीच.       ...

रंग आयुष्यातील

वेदनेचे रंग गहिरे  आयुष्याला घाली कोडे, सुखदुःखाच्या रंगामधले कसे घ्यावे थोडेथोडे. डोळ्यांमध्ये भरुन घ्यावे उषेमधले रंग गुलाबी, एकांतामध्ये हळूच गावे तुझे माझे गीत शराबी. फुलाफुलांचे रंग आगळे नात्यांमध्ये असे भरावे, नावाबद्दल नात्यांच्या मग किंतू सारे तिथे सरावे. फुलपाखरी रंग गोजरी आकाशात भिरकावून द्यावे, आयुष्याला तुझ्या माझ्या  रंगबेरंगी रंग भरावे. आभाळाचा रंग निळा तो हृदयामध्ये असा भरावा तुझे माझे भेदाभेद मग मनामधून पूरा सरावा. वेदनेचे रंग गहिरे  कुपी मध्ये भरुन घ्यावे, यशाच्या भाळी रेखून गर्वापासून दूर सरावे. आठवतले रंग सारे शब्दांमध्ये भरुन घ्यावे, गीत म्हणून त्यांनाच मग आपल्यांसंगे खुषीत गावे. ----अभय बापट. २८/०२/२०२६

शब्द

शब्दांच्या पाठून येते शब्दांचे वास्तव ओझे, शब्दांच्या भावनांचे नकळत पाऊल वाजे. शब्दांनाही येते जाग शब्दांनाही असती भोग, शब्दांनाही सोसावी लागते आपल्या पुर्व कर्माची धग. -----अभय बापट २२/०२/२०२६

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा प्रताप....                शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे.                शिवरायांची सलगी देणे, माणसांशी, परिस्थितीशी,प्रसंगांशी आठवणे, त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करणे हिच महाराजांना खरी आदरांजली. पण आपल्या समाजाचे झालेय काय, आपण आपल्या आदर्शांना, सर्वोत्तम नेतृत्वांना देवत्व बहाल करुन, त्यांच्या गुणांचे, त्यांनी आचरणात आणलेल्या विचारांचे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करण्यातून मुक्त होतो.                मुक्त होतो आर्ततेने साद घालायला, महाराज पुन्हा जन्म घ्या.                 शिवरायांनी बालवयात आपल्या बालसवंगड्यांच्या मनात पराक्रमाची ठिणगी पेटवली, असंख्य ज्ञात अज्ञात मराठी मनाच्या हंकारातून त्याचा वडवानल झाला.                 पण ती एकदा पेटवलेली ठिणगी जपण्यासाठी शिवरायांना कितीजणांना सलगी द्यावी लागली, किती कठिण प्रसंगातून पार पडावे लागले, कि...