Skip to main content

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा प्रताप....

               शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे.

               शिवरायांची सलगी देणे, माणसांशी, परिस्थितीशी,प्रसंगांशी आठवणे, त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करणे हिच महाराजांना खरी आदरांजली.
पण आपल्या समाजाचे झालेय काय, आपण आपल्या आदर्शांना, सर्वोत्तम नेतृत्वांना देवत्व बहाल करुन, त्यांच्या गुणांचे, त्यांनी आचरणात आणलेल्या विचारांचे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करण्यातून मुक्त होतो.
               मुक्त होतो आर्ततेने साद घालायला, महाराज पुन्हा जन्म घ्या.
                शिवरायांनी बालवयात आपल्या बालसवंगड्यांच्या मनात पराक्रमाची ठिणगी पेटवली, असंख्य ज्ञात अज्ञात मराठी मनाच्या हंकारातून त्याचा वडवानल झाला.
                पण ती एकदा पेटवलेली ठिणगी जपण्यासाठी शिवरायांना कितीजणांना सलगी द्यावी लागली, किती कठिण प्रसंगातून पार पडावे लागले, किती मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागले हे त्यांचे परिस्थितीशी सलगी देणे हेच
पुढे जावून बनलेल्या मराठी साम्राज्याचे,हिंदवी स्वराज्याचे
गमक आहे,
                 प्रतापाच्या गाथा लिहील्या जातातच, त्या तशा जायलाच हव्यात कारण त्याच आपल्याला दुर्दम्य आशावाद देत असतात, पण त्यांच्या गुणांचा अभ्यास,पाठराखण, आचरण आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याचे काम करतात.
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
 कैसी असे ।।२।।

सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।

याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।

शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।

निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।

– समर्थ रामदासस्वामी

----अभय बापट

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४