Skip to main content

अलिबाग व अष्टागाराचा शैक्षणिक इतिहास

अलिबागसे आया है क्या ?
    हो मी अलिबागमधून आलोय आणि मला अभिमान आहे  
    -------------------------------------------------------------------          मी अलिबागचा आहे.अलिबाग तालुका व अष्टागाराने मराठी  भाषेचा,मराठी शिक्षणाचा,मराठी विद्येचा पाया घातला.तो पाया एवढा कमकुवत नाही की कोणत्या विनोदी लेखकाच्या अचरट विधानाने तो डळमळीत होईल.
         अलिबाग तालुक्यातील सूडकोलीचे नारायण सदाशिव मराठे उर्फ स्वामी केवलानंद सरस्वती      ( १८७७ - १९५५ ).
         स्वामी केवलानंद यांचे शिक्षण सनातनी वातावरणात झाले असले तरी ते त्यांनी अस्पृश्यता निवारण,आंतरजातीय विवाह, सर्वजातींना वेदाभ्यासाचा अभ्यास या गोष्टींचा पुरस्कार केला.आपले गुरु प्रज्ञानंद स्वामी यांच्या निधनानंतर १९०६ वाई मध्ये प्राज्ञ मठशाळा काढली, १९१६ मध्ये तीचे रुपांतर प्राज्ञ पाठशाळेत झाले व ती राष्ट्रीय शिक्षणाची केंद्र बनली.
         केवलानंद सरस्वती यांनी आपला विख्यात विद्यार्थी लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सहकार्याने १९२७ मध्ये हिंदू धर्म व तत्वज्ञान यांचा ज्ञानकोश लिहीण्यासाठी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेत धर्मकोश कार्यालय सुरु केले व हिंदू कायदा,धर्मतत्व मिमांसा,धर्म,तत्वज्ञान,सामाजिक विचार यासंबंध सात कोश प्रसिद्ध केले.
         अलिबाग तालुक्यातील अक्षी येथील १०१२ सालचा नऊ ओळींचा शिलालेख हा मराठी भाषेतील आद्य शिलालेख मानला जातो.
         केरूनाना छत्रे यांची नागांव ही जन्मभूमी तसेच कर्मभूमी होय.
        रघुनाथपंडीत मनोहर यांचा जन्म १६४० साली चौल इथे झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण चौल इथे झाले.१६६७ मध्ये नशीब काढायला तंजावर इथे गेले व तंजावरचे राजे एकोजी भोसली यांच्या दरबारी दरबारी पंडीत बनले.दमयंतीस्वयंवर, चिकित्सामंजीरी,नाडीज्ञानविधी,कवीकौत्सुभ व इतर अनेक ग्रंथ लिहीले. १७२० मध्ये त्यांचे तंजावर इथे निधन झाले.
         चौल,नागांव,अष्टागारांतील जगन्नाथशास्त्री क्रमवंत,दाजीशास्त्री शुक्ल,बाळकृष्णशास्त्री सोवनी,गंगाधरशास्त्री फडके यांनी मोल्सवर्थ,मेजर कँडी, जॉन रिस्टो जर्व्हिस,माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कोश तयार केले.मराठी भाषेचा कोश, मराठी व्याकरण, पाठ्यपुस्तके तसेच शास्त्रीय पुस्तकांचे भाषांतर करुन त्यांनी मराठी भाषेची अनमोल सेवा केली.
          १८२९ साली मोल्सवर्थ व मेजर कँडी यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांनी तयार केलेला मराठी-मराठी कोश हा मराठी भाषेतील पहिला कोश.१९३१ साली जगन्नाथशास्त्री क्रमवंत यांनी याची पुरवणी प्रसिद्ध केली.
१८७० मध्ये सर्वसंग्रह मासिकाचे संपादक माधवराब चंद्रोबा डुकले यांनी आवासच्या कृष्णशास्त्री पेंडसे यांच्या सहकार्याने तेव्हापर्यंतचा सर्वात मोठा कोश "शब्दरत्नाकर" तयार केला.वैद्यकशास्त्रीय परिभाषेचे विस्ताराने विवचन हे त्याची विशेषता.
          नागांवच्या गंगाधरशास्त्री फडके यांनी " मराठी भाषेचे व्याकरण" प्रसिद्ध केले.१८३६ मध्ये शिळाप्रेसवर छापलेले हे व्याकरण मराठीच्या पहिल्या दोन व्याकरणापैकी एक, दोन्ही १८३६ मध्येच छापण्यात आली.
           जॉन रिस्टो जर्व्हिस याने गंगाधरशास्त्री फडके,जगन्नाथशास्त्री क्रमवंत व बाळशास्त्री घणवे यांची नेमणूक मराठीचे व्याकरण लिहीण्यासाठी केली ते त्यांनी संस्कृत व्याकरणाच्या आधारे लिहीले.हे हस्तलिखित व्याकरण मराठीचे पहिले व्याकरण पुढे रामशास्त्री जन्हवेकर यांनी त्याचे मुलांसाठी संक्षिप्त रुपांतर लिहीले.
१८७६ मध्ये रेवदंड्याच्या शंकर बाळकृष्ण दिक्षीत यांनी कवितेचे विद्यार्थीबुद्धी वर्धीनी हे व्याकरण लिहीले.दिक्षीत यांनी गणित व ज्योतीष यासंबंधी नऊ पुस्तके प्रसिद्ध केली.भारतीय ज्योतिषशास्त्र,ज्योतिर्विलास व हिंदू पंचांग ही प्रसिद्ध पुस्तके. हिंदू पंचागात हिंदू कालगणनेसंबंधी माहीती असली तरी हिंदुस्थानात सापडलेल्या शिलालेखांत व ऐतिहासिक पत्रात दिलेल्या दिवसांची इंग्रजी तारीख निश्चित करणे हा मुळ हेतू आहे.
             दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हटले जात असले तर मराठी व्याकरणाच्या जनकत्वाचा मान नागांव,चौल व अष्टागारांतील पंडीतांकडे जातो,तर्खडकर यांनी आपल्या आत्मवृत्तात दाजीशास्त्री शुक्ल यांचा उल्लेख आपले गुरुजी  असा आदराने केला आहे.
            एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी पाठ्यपुस्तकांचा अभाव जाणवू लागला, शास्त्रीय वाड्मय निर्मितीच्या त्याकाळात विल्यम हेन्री बेल याने १८५६ साली चौलच्या नारायणशास्त्री जोशी यांच्याकडून शिल्पविद्या या विषयावरचे निबंध लिहून घेतले.
           १८५३ मध्ये शिक्षामंडळाने अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी गोविंद गंगाधर फडके यांचे "यंत्रशास्त्राची  मूळे" हे पुस्तक छापले.
           जॉर्ज जर्व्हिस याने याच काळात जगन्नाथ शास्त्री क्रमवंत व इतर अष्टागारातील मंडळींकडून अंकगणीत,बिजगणित,अधिकरण भूमिती,कर्तव्य भूमिती या विषयावरील शालेय पुस्तके भाषांतरीत करुन घेतली.या पुस्तकांमुळे मराठी भाषेत पाश्चात्य गणिती विद्येचा पाया घातला.
           शालोपयोगी भाषांतरीत पुस्तकांच्या संदर्भात नागांवच्या सदाशिव काशिनाथ तथा बापू छत्रे यांनी महत्वाचे काम केले.१९२३ साली त्यांची शाळापुस्तक मंडळाचे सेक्रेटरी म्हणून नेमणूक झाली.सिंहासनबत्तिशी,इसापनीती,वेताळकथा, बाळमित्र ,बोधकथा ही पुस्तके भाषांतरीत केली. बाळमित्र पुस्तकावरुन मराठी मुले मराठी शिकत असत.
भाऊ महाजन यांनी मराठीतील पहिला प्रबंध "शब्दसिद्धी निबंध" लिहीला.
           थळच्या गणपत कृष्णाजी पाटील यांनी १८३१ मध्ये शिळाप्रेस सुरु केली व त्याच वर्षी मराठीतील पहिले पंचांग छापून प्रसिद्ध केले.
(आंतरजाल व शोधगंगावर आधारीत)

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४