आभाळ ओळखीचे फाटून ते, गेले
अनोळखी जगात रात्र रात्र जागतो मी.
केव्हा तरी मनाचा कोपरा विरून गेला
करण्या रफू तयाला धागा शोधतो मी.
मी नव्हतो कधी कुणाचा तू आपलेसे केले
जेव्हा तुझाच झालो का हात वर केले.
आपुलाच होतो वैरी माणूस जगात आपल्या
जोडलेले अमोल मोती जेव्हा गळून जाती.
नको नको रे मनुष्य ओझे शिरी तू घेवू
जे पेलवत नाही नाते जोडत जावू.
Comments
Post a Comment