दरवर्षी प्रमाणेच तो आतूरतेने धावत आला, वर्षातून एकादाच यायची संधी मिळालयची,कितीही आतूरता असली भेटीची तरी दोघांमध्ये एक अदृष्य भिंत तयार होतच असे दरवर्षी, त्या आठ महिन्यांच्या दूराव्याने.
त्याच्या आगमनाने ती प्रफुल्लित झालीच,लाज हा तिचा दागिना मिरवत सलज्जपणे उभी राहीली त्याने पाऊल पुढे टाकण्याची वाट बघत.
तोही काहीक्षण तीचे रुप निरखत दूर उभा राहीला, पण त्याल्या पुढे पाऊल टाकणे भाग होतेच.
त्याची आतुरता, त्याचा आवेग तिला नवीन नव्हता, हा अनुभव ती वर्षानुवर्षे घेत होती, पण यावेळचा त्याचा आवेग अचाट म्हणावा लागेल असाच आहे.
त्याचा आवेग सहन करण्याची ताकद तिला मिळू दे, कारण तो परदेश प्रवासासाठी निघूनही जाईल पण थकले भागलेली ती जर कोलमडून पडली तर तीच्या कच्च्याबच्च्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघावे.
शेवटी प्रत्येक "ती" क्षणभराची पत्नी असली तरी अनंत काळची "माता" आहे .
तीला सावरायलाच हवे, उभे राहायलाच हवे.कारण शेवटी ती सर्वांना धारण करणारी धरित्री आहे.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment