Skip to main content

निरर्थकाची डायरी ८

निरर्थकाची डायरी......

माणसं कसली कसली ओझी डोक्यावर घेवून जगत असतात.
       काही स्वत:च्या आनंदासाठी,वेळ आनंदात जाण्यासाठी टिव्ही बघतात आणि सिरियलमधेच गुंतून पडतात. दिवसभर त्या सिरियल्सची वाट बघणं, त्या गोष्टींचाच विचार करत बसणे.
        दुसऱ्या प्रकारची लोक, त्यांना या सिरियल्स अजिबात आवडत नाहीत, त्या सिरियल्सचा द्वेष करतात, त्या चालू असताना टिव्हीसमोर बसणे ही त्यांना जमत नाही.
         खरे म्हणजे या सिरियल बघणे म्हणजे निव्वळ हमाली, खोट्या गोष्टीतील सुख-दु:खाच्या भावनांचे ओझे स्वत:च्या माथी घेणे.
         कोणताही हमाल डोक्यावरचे ओझे विनाकारण डोक्यावर वागवत नाही,वेळ आली की डोक्यावरुन उतरवून टाकतो,मोबदला खिशात सारतो, पुढे सरतो.
         तसेच त्या सिरियलमुळे झालेला आनंद किंवा मानसिक त्रास ही त्या ओझ्याची बिदागी समजून ते ओझे माथ्यावरुन उतरवून टाकले पाहीजे.
         प्रत्येकवेळी मनपसंद मोबदला मिळेल किंवा नाही,तरी योग्य क्षणी ते ओझे उतरवणेच सर्वोत्तम मार्ग मानसिक शांतीचा.

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४