बातमीचा प्रवास
जवळपास महिन्यांपूर्वी एबीपी माझावर महाड-भोर रस्त्यावर घाटात बिबट्या दिसल्याची बातमी आणि व्हिडीओ दाखवला.
आमच्या इथे येताना तो व्हिडीओ अलिबाग बाहेरच्या कार्लेखिंडीत बिबट्या दिसला अशी झाली.
पुढे आमच्या गावातील व्हॉट्सअपवर येताना ती बातमी गावाबाहेरच्या डोंगरावर बिबट्या दिसला अशी झाली.
नशीब गावातील आमच्या भागात डोंगर,टेकडीच सोडा, साधी राई सुद्धा नाही नाहीतर त्या राईचा पर्वत करुन त्या बिबट्याला त्या पर्वतावर उभा केला असता.
प्रत्येक गोष्ट किहीतरी शिकवत असते, प्रत्येक क्षण आपला गुरु असतो, बातमी फॉरवर्ड करताना जबाबदारीने करावी एवढीच शिकवण आपण शिकलो तरी गुरुपौर्णिमा साजरी झाली समजायचे.
Comments
Post a Comment