कसे सांगू "काळजी घ्या" अनेकांना ते मुर्खपणाचे वाटते.
कसे सांगू "सर्व ठिक होईल, देव पाठीशी आहे" नास्तिकांना हे अडणीपणाचे वाटते.
आपण शब्दांनाकडे चौकसपणे बघताबघता त्यामागच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो. इंटरनेटमुळे जग जवळ आल्यापासून एवढ्या अनपेक्षित घटना, संकटे बघायला मिळतायत की आपण भावनाहीन बनत चाललोय.
हेच सर्व इंग्लिशमध्ये म्हटलं की मात्र आपल्याला गोड वाटते.
पण जिथे आपण स्वत: मदतीला जावू शकत नाही तिथे या भावनाच लाखमोलाच्या असतात.
देव संकटात मदतीला येईल हा विश्वास पुढे जायला, जोखिम पत्करायला आधार देतात, " कोणतीही जोखिम न पत्करणे हीच मोठी जोखिम आहे" असे पहिली हृदयरोपण शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर बर्नाड यांनी म्हटले आहे.
कोणीतरी अशा विश्वासाने पुढे जात असेल ते बघून एखाद्या माणसातली माणूसकी जागी होवून तो मदतीला येतो, तेव्हा आपण म्हणतो," अगदी देवासारखा धावून आला"
भावना कुचकामी नसतात, एखादी श्रद्धा जर मानसिक आधार देत असेल तर तिला टाकाऊ का समजावे ? आपली संस्कृती याच एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावनांवर, या श्रद्धेच्या पायावर उभी आहे,टिकून आहे.
Comments
Post a Comment