आपला कल काय कर हे सांगण्यापेक्षा काय करु नको हे सांगण्याकडे असतो. खरा मार्गदर्शक तोच असतो जो कोणाता मार्ग निवडावा यासाठी मार्गदर्शन करतो.
इथे फेसबुकवरही लोकांच्या टिंगलटवाळीच्या पोस्टवरुन,कॉमेंट्सवरुन काय करु नये याचेच क्लासेस चालवलेले दिसतात.
कोणाची काळजी करण्याची गरज नाही, प्रत्येकजण स्वत:ची काळजी घेतच असतो. हे इथेच समजते.
इथे कोणाशी नाती जोडू नयेत हे ज्ञानही इथेच दिले जाते.
मला आठवतेय पाच-सात वर्षांपूर्वी एका ८२ वर्षांच्या गृहस्थांना कॉमेंटमध्ये काका म्हणालो तेव्हा ते ताडकन म्हणले," नाते जोडण्याची गरज नाही, आपण इथे फ्रेंड आहोत तेवढेच बास आहे".
मग मी विचारले, "म्हादू, रत्नागिरीत कुठे राहतोस रे?" तर तो दोस्त रागवून अनफ्रेंड करुन गेला, माझं काही चुकला का ?
पण एक धडा मिळाला पहिल्याच ओळखीत नातं जोडू नये आणि वय बघून तर कधीच नको.
Comments
Post a Comment