जगून घ्यावे असे वाटते
मरुन जावे असे वाटते,
तुझ्याविना श्वासालाही
थांब म्हणावे असे वाटते.
हसत रहावे असे वाटते
रडून घ्यावे असे वाटते,
साठवलेल्या आठवणींना
लुटून टाकावे असे वाटते.
पुन्हा बघावे असे वाटते
पुसून टाकावे असे वाटते,
स्मृतीमधल्या तुझ्या छबीला
"तू कोण?" पुसावे असे वाटते.
सारे व्यर्थ आहे असे वाटते
निव्वळ स्वार्थ आहे असे वाटते,
जे जे आहे आपुलकीचे सारे
तसेच जपावे असे वाटते.
२५/०५/२०२२
Comments
Post a Comment