सुखाच्या क्षणी कोण लक्षात राहतो...
दु:खाच्या क्षणी हाक मारत जा तू
वेदनेला दिली मी ओसरी मनाची...
व्यथेला पत्ता माझा विचारत जा तू.
आषाढाचे दूत आले आज दारी...
विरहाची वेदना जाणत जा तू.
नको दु:खे गांजू नको सुखे माजू
मनाला जरा समजवत जा तू.
नसतो सदा मित्र,नसतो सदा शत्रू...
माणसाला आपल्या ओळखत जा तू
०१/०७/२०२२
Comments
Post a Comment