कुणी शहाणा इथे लाचार आहे
कुणी स्वत:च्या बुद्धीने बेजार आहे.
आता कुठे उरली किंमत ज्ञानवंताला
विद्येचा चालला इथे व्यापार आहे.
आभाळच झुकते भूमीवरती सदा
सत्तेपुढे सर्व काही बेकार आहे.
माणूसच कापतो माणुसकीचा गळा
प्रत्येकजण आता इथे निराधार आहे.
---- अभय बापट
२०/६/२०२२
Comments
Post a Comment