माणसांना देव मानणे सोडले मी
शब्दांना प्रमाण मानणे सोडले मी.
भेटून आलो जेव्हा वादळवाऱ्याला
स्वप्नांना थांब सांगणे सोडले मी.
निखळून पडले माळे मधले मोती
नात्यावर अधिकार सांगणे सोडले मी.
दाबून टाकले शब्द माझे ओठांमधे
वेदनांचे गीत गाणे सोडले मी.
तुडवून टाकले अंकुर सारे उमाळ्याचे
पुन्हा नव्याने रुजून येणे सोडले मी.
दिले होते अभय त्याने जगण्याला
हक्काची रुजवात करणे सोडले मी.
०३/०६/२०२२
Comments
Post a Comment