खुप दिवसांनी पुन्हा एकदा
पाऊस भरुन आला
आणि धरत्रीच्या मनामध्ये
आशेचा अंकुर फुटला.
खुप दिवसांनी वादळवीज
धरणीकडे धावली
शेतकऱ्यांच्या हातावर
समृद्धीची रेषा उमटली.
खुप दिवसांनी माती
सुगंधाने नटली
कष्टकऱ्याला ओठांवर
समाधानाची रेषा दिसली.
खुप दिवसांनी मातीमधून
सृजनाचा हुंकार आला
आणि बाळ माझ्या भुमीचा
आईच्या कुशीतच रमला.
खुप दिवसांनी वावराला
नवचैतन्य आले,
शेजारच्या झोपडीलाही
स्वर्ग रुप लाभले.
---अभय बापट
०९/०६/२०२२
Comments
Post a Comment