शिवरायांचा आठवावा प्रताप.... शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे. शिवरायांची सलगी देणे, माणसांशी, परिस्थितीशी,प्रसंगांशी आठवणे, त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करणे हिच महाराजांना खरी आदरांजली. पण आपल्या समाजाचे झालेय काय, आपण आपल्या आदर्शांना, सर्वोत्तम नेतृत्वांना देवत्व बहाल करुन, त्यांच्या गुणांचे, त्यांनी आचरणात आणलेल्या विचारांचे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करण्यातून मुक्त होतो. मुक्त होतो आर्ततेने साद घालायला, महाराज पुन्हा जन्म घ्या. शिवरायांनी बालवयात आपल्या बालसवंगड्यांच्या मनात पराक्रमाची ठिणगी पेटवली, असंख्य ज्ञात अज्ञात मराठी मनाच्या हंकारातून त्याचा वडवानल झाला. पण ती एकदा पेटवलेली ठिणगी जपण्यासाठी शिवरायांना कितीजणांना सलगी द्यावी लागली, किती कठिण प्रसंगातून पार पडावे लागले, कि...
Comments
Post a Comment