Skip to main content

नवा पाऊस

पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय
वेळ देऊनही मुहूर्त टाळायला लागलाय.

पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय 
दोन थेंब शिंपडून लाईक कॉमेंट्स वाट पहायला लागलाय.

पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय 
आकाशाचा अर्थ लावत भूमीला कोसायला लागलाय.

पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय 
भरलेलं आभाळ सोडून वाऱ्यासंग धावायला लागलाय.

पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय 
नात्यांसारखाच आता अधांतरी रहायला लागलाय.

पाऊसही आता माणसासारखा वागायला लागलाय 
एकीकडे भरुन येवून दुसरीकडे बरसायला लागलाय.

-----अभय बापट
     ३०/०६/२०२६

Comments

Popular posts from this blog

शिवरायांचा आठवावा प्रताप

शिवरायांचा आठवावा प्रताप....                शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचे सलगी देणे कैसी असे.                शिवरायांची सलगी देणे, माणसांशी, परिस्थितीशी,प्रसंगांशी आठवणे, त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करणे हिच महाराजांना खरी आदरांजली. पण आपल्या समाजाचे झालेय काय, आपण आपल्या आदर्शांना, सर्वोत्तम नेतृत्वांना देवत्व बहाल करुन, त्यांच्या गुणांचे, त्यांनी आचरणात आणलेल्या विचारांचे, त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे आचरण करण्यातून मुक्त होतो.                मुक्त होतो आर्ततेने साद घालायला, महाराज पुन्हा जन्म घ्या.                 शिवरायांनी बालवयात आपल्या बालसवंगड्यांच्या मनात पराक्रमाची ठिणगी पेटवली, असंख्य ज्ञात अज्ञात मराठी मनाच्या हंकारातून त्याचा वडवानल झाला.                 पण ती एकदा पेटवलेली ठिणगी जपण्यासाठी शिवरायांना कितीजणांना सलगी द्यावी लागली, किती कठिण प्रसंगातून पार पडावे लागले, कि...

बळ पंखातले

नाही मिळत कोठे उसने पंखामधले बळ ठेव पाय भुईवर आणि भर कवेत आभाळ नाही देत कोणा कोणी फुकटची साऊली बांध घरटे उबेत आणि हो जगाची माऊली. नाही देत कोणी फुका ज्ञानाचा प्रकाश हो सावित्रीची लेक आणि धर पुस्तकांचा ध्यास. नाही उगाच दरवळत जीवनाचे चंदन मान ठेव श्रमांचा आणि कर सत्याला वंदन. नाही मिळत सहज कुणाला कीर्तीचे ते धन जप ध्येय मनाशी आणि कर परिश्रम साधन. नाही घालत उगाच गळ्यामध्ये यश किर्तीचा हार ठेव जिद्द मनामध्ये आणि घाल अंधारावर वार. --- अभय बापट ०८/०३/२०२६

पंखांमधले बळ