ओळख पुस्तकांची... माणसं---- लेखक विजय तरवडे ही माणसं,तुमच्या आमच्यातली, आठवणीत डोकावून पहायला लावणारी.ही वल्ली नाहीत, ही अरभाटही नाही कारण ही आहेत खरीखुरी माणसं आपल्यातील, आपणचं. श्री. विजय तरवडे यांची ही माणसं आपल्याला आपल्या भुतकाळाची आठवण करुन देतात. काही चुका, काही आनंदाचे क्षण, आपल्या तरुणपणातील न विसरता येणाऱ्या माणसांचे पुन्हा स्मरण करुन देतात. खुपपुर्वी ललित साहित्य आवडीने वाचले होते. नंतरच्या काळात रहस्यकथा,साहसकथा,भयकथा, विज्ञानकथांची पारायणे करुन झाली. पुन्हा नव्याने ललित साहित्य आणि व्यक्तीचित्रांच्या मोहमयी दुनियेत ज्यांनी बोट धरुन फिरवून आणले ते रविंद्र पिंगे इथे आहेत. जयवंत दळवी इथे आहे. सहसा दुर्लक्षित राहीलेले सुहास शिरवळकर ज्यांच्या बहुतेक सर्व साहित्याची पारायणे पुन्हा पुन्हा केली ते आनंद...