कुठे गेला कान्हा , वाट थांबली जीवाशी
युमेनेच्या वाटेवर थरथर दाटे उराशी.
नूपुर थांबले माझे, थांबली पावले सारी,
राधेवीना एकाकी कृष्णा तुझी रे बासरी
योगेश्वर तू जगाचा आले शरण तुला आज
आठवणीत अजून तुझा मोरपीसांचा साज.
वेळूबनामधून आज वारा वाहे रुणझुण
तुझ्यावीन त्यांच्या देही वारा फुंकतो प्राण.
आकाशा सारखे तुझे रुप मन भेटण्या अधीर
आकाशाच्या गाभ्यातून कृष्ण सगुण साकार.
-----अभय बापट
०१/१२/२०२५
Comments
Post a Comment