आता होते असे कधी
सापडले मुठीत काही क्षण,
आणि उसवते ठायी ठायी
अबोध अजाण माझे मन.
किती जपावी लागते आता
नात्यामधली आपल्या वीण,
चुकलेल्या एका क्षणाने
फाटते तुटते माझे मन.
ओंजळा राहते पुरी रिकामी
किती टाळावे लागते रण,
सुगंधाच्या क्षणाक्षणाला
आतूर उत्सुक माझे मन.
कधी टळेल हा ग्रीष्म
कधी फुलेल पुन्हा बन,
तुझ्या प्रीतीच्या वाटेवर
तृषार्त सावळे माझे मन.
----अभय बापट
२४/१२/२०२५
Comments
Post a Comment