*शेल काव्य चारोळी*
*विषय-सुटला गारवा*
सुटला गारवा
गारवा गुलाबी,
गुलाबी सौंदर्या
नशा ही शराबी.
----अभय बापट
चाहूल घेवून आली
आली मेघांची वरात,
सुटला गारवा अन्
अन् समुद्र भरात.
---अभय बापट
घेवून श्रावण आला
आला निसर्ग भरात,
सुटला गारवा तरी
आला आनंद घरात.
--- अभय बापट
Comments
Post a Comment