चंद्र डोईवर आला, जीव होई अधीर
कधी येणार सखया, अश्रूंचा सुटला धीर.
रात गेली झोप उडाली, धूसर झाली पहाट
स्वागताला तुझ्या राया शृंगारली पायवाट
मनात पेटली ओढ, उर व्याकूळ खरोखर
तुझ्याविना वाटे मला दाही दिशा अधीर.
काळजात जखमा जाग्या, श्वास बोलका झाला
नाव जपून धरताना माझा श्वासही रेंगाळला
तुझ्या नावाचा आठवांनी श्वास सुगंधी अमीर
कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर.
नाही सोसवत आता आले तुम्हा मी शरण
डोळ्यांतून ओघळती रे नीराचे पिकले धन.
भरल्या मनामध्ये नाचे मनमोर मत्त मयूर
कधी येणार रे सखया अश्रूंचा सुटला धीर.
सोळा शृंगार साज, तुझ्याचसाठी मी केला
काजळ, हळद कुंकवी, रांगोळी अंगणी मांडला.
ग्रीष्मानीही मांडला एकाकी जीवनी कहर
कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर.
घेतले निरांजन हाती, हाती हिरवे कंकण
तुमच्या मनात उरावे हेच मला रे भूषण
मनामध्ये माजतोय भयभिषण काहूर
कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर.
चंद्र डोईवर आला जीव होई अधीर
कधी येणार सखया अश्रूंचा सुटला धीर.
----- अभय बापट
०६/१२/२०२५
Comments
Post a Comment