शब्द सूचतात तुला पाहून,
अन बनते इथे शायरी.
अर्थ शोधतो तुझ्या मनीचा,
अन बनते खोल चिंतन.
शब्द आणि चिंतन मिळूनी
अर्थवाही बनते जिवन.
नात्यांचे अनेक रंगी
रेशिमधागे गुंफू आपण.
धारण करूनी गोफ अनोखा
कुटूंबाचे सजवू तोरण.
एकमेकां देवू आधार
जीवन गाणे गावू निरंतन
जीवन गाणे गावू निरंतन
Comments
Post a Comment