शुर आम्ही सरदार आम्हाला
काय कुणाची भीती,
देव,पक्ष आणि धर्मासाठी
दिवस खर्चले आम्ही.
खुप मोठी आग लोकांच्या मनात लागली असणार, ती शांत करण्यासाठी चौकशी आयोग नावाचा यज्ञ आरंभला जाईल, त्यात आहुती पडतील त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या, ज्यांच्या नाड्या बड्या लोकांच्या हातात असतात.
" एकमेंका सहाय्य करु, अवघे होऊ श्रिमंत" सहकाराचे हे तत्व राजकारणात तंतोतंत अंमलात आणले जाते. वैयक्तिक दुष्मनी नसले तर सर्व पक्ष एकमेकांच्या पक्षातील भ्रष्ट लोकांची काळजी घेत असतात.
आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५
Comments
Post a Comment