साबाजी तुकाजी चिटणीस
आणि
कृष्णाजी तुकाजी चिटणीस
नागांवच्या या दोन सुपुत्रांची आज येण्याचे कारण म्हणजे नागांवमध्ये उद्भवलेली पुरसदृश्य परिस्थिती. १७०७ ते ४ ऑगस्ट १७७१ एवढी दिर्घ काळ त्यांचे नाव इतिहासात येते,१७७१ मध्ये साबाजी चिटणीस यांचे पुणे इथे निधन झाले.
आंंग्रेकालातील कर्तबगार म्हणून ते ओळखले जात.
खार जमिनींचा प्रश्न जेवढ्या प्रभावीपणे यांनी सोडवला तेवढा इंग्रज असो वा स्वराज्यातील शासन कोणालाही सोडवता आला नाही.कान्हाजी,सेखोजी, मानाजी,राघोजी या चार आंग्रांची कारकीर्द त्यांनी अनुभवली.पुढे राघोजी आंग्रे यांच्याशी बिनसले म्हणून ते पुण्यात जावून स्थाईक झाले तिथेच त्यांचे निधन झाले.
या दोघांनी नागांव व चौलमधील खार जमीन बंदिस्त करुन शेती योग्य केली. त्यांच्या पासून प्रेरणा घेवून मांडवा, चौल, चिंचोटी,मढेखार, नागांवमधीलच कोठारभाट ते अगदी दापोलीपर्यंत खार जमिनी बंदिस्त करुन शेती योग्य केल्या गेल्या.
या दोघांचे कोकणावर अनन्य उपकार आहे.यांच्याकाळात नागांव व अष्टागार भात पिकाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले
नागांवच्या समृद्धीचे हे दोन शिल्पकारच.नागांवच्या खारखाजण जमीनीत येणारे समुद्राचे पाणी बंदिस्त करुन यांनी गावाला समृद्ध बनवले आणि आता गावातले पावसाचे पाणी समुद्राकडे जाणारे रस्ते बंद करुन नागांवला परत बेट सदृश्य रुप मिळवून दिले.विकासाची उलटी गंगा ती हीच असेल का ?
संदर्भ:- नागांवचे आर्थिक व सामाजिक जीवन-- लेखक:शां.वि.आवळसकर
Comments
Post a Comment