तो मित्र आहे,
तो सखा आहे,
तो प्रेमी आहे,
तो पुत्र आहे,
तो भाऊ आहे,
तो गुरू आहे,
तो शिष्य आहे.
मुख्य म्हणजे तो प्रत्येकाचे ऐकून घेणारा आहे, तो प्रत्येकाला समजून घेणारा आहे, तो प्रत्येकाला समजावून सांगणारा आहे.
तो कर्तव्यदक्ष आहे, तो कर्मप्रेमी आहे, तो अखंड योगी आहे.
तो यशोदेचा आहे, तो राधेचा आहे, तो रुक्मिणीचा आहे, तो सत्यभामेचा आहे, तो सुदाम्याचा आहे, तो अर्जूनाचा आहे,तो धर्मराजाचा आहे, तो कुंतीचि आहे, तो विदूराचा आहे.
तो सर्वांचा आहे पण सर्वांपासून अलिप्त आहे.
तो प्रगतीचा आलेख आहे.
तो माणसाचा आतला आवाज.
तो गुणावगुणांचा संग्रह आहे.
तो आदर्श माणूस आहे, तो प्रत्येकाचा आपला देव, त्याच्यापाशी सर्व आहे.
तो सर्वांचा कृष्ण आहे.
Comments
Post a Comment