Skip to main content

मंदी

मने,
       तुला चिडवण्यासाठी मंदीचे नाव घेतले, माझ्या भाचीला एवढी आठवण येतेय,उचक्या येवून मरणार बहुतेक मंदी.
       खुप काही मोठं नसतं मंदी म्हणजे, स्वत:ला आवरायचं आणि वेळेवर सावरायचं की मंदी नावाचे भूत पळून जाते पार्श्वभागाला पाय लावून.
       आता तूच बघ, अनुभवतोच की आपल्या नात्यातही आपण, कधी तेजी तर कधी मंदी. ९९% जणं सावरतातही त्या मंदीच्या तडाख्यातून . काहीजणं चटकन् सावरतात काही काहीजणांना वेळ लागतो, खचणारा आणि सर्वस्व गमावणारा एखादाच शंभरात.
       आपल्या भावनांची गुंतवणूक कधी एकाच जागी करू नये हे साधे सोपे पथ्य पाळले की झाले.
       आपल्या आनंदाची, सुख:दु:खाची गुरुकिल्ली कोणा एकाच्या हातात गेली की लागलीच आयुष्याची वाट, ती गुरुकिल्ली आपल्या हातात हवी आपण ठरवायला हवं आणि वेळीच सावरायला हवं‌.
       आठवतयं का तुला, पंधरा-वीस वर्षांपूर्वी वैभव विळ्यांची लाट आली, कापणी करायची की वैभव विळा हवाच जणू. वैभव विळा बनवणारी एक वर्कशॉपच निघाले.
       लोहारांची कोयती जणू इतिहासात हरवूनच जातेय असे वाटावे अशी परिस्थिती आली. पण ते लोहार फक्त कोयतीच बनवत नव्हते शेती घरगुती उपयोगाच्या असंख्य वस्तू बनवत होते त्यामुळे ते स्वत:ला सावरु शकतो आता वैभव विळा आणि फक्त विळे बनवणारे ते वर्कशॉप दोन्हीही  बाद झाले. लोहार मात्र ठामपणे उभे राहू शकले.
       एकाच जागी पाय गुंतून पडला की पुढे जाण्याचा मार्ग बंद होवून जातो हेच खरे. म्हणूनच गुंतवणूक आपल्या स्किलची, आपल्या भावनांची, आपल्या पैशाची विचारपूर्वक, योग्य ठिकाणी करावी लागते.
      

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४