सांप्रतच्या काळी भरतखंडामध्ये महाराष्ट्रदेशी, फेसबुक नामें महानगरातील तरुणवर्ग शिवानी नामक देवीची मानसभक्ती करण्यात लिप्त झालेला दिसून येत आहे.
या मध्ये माझे बंधू,मित्र,सखे, सोबती प्रामुख्याने सहभागी असल्याचे निदर्शनास आल्याने माझे मन प्रेमभावनेने उचंबळून आले आहे.
यास्तव हा अभंग सादर करत आहे तो गोड मानून घ्यावा हि विनंती.
माझ्या आप्तांच्या हृदयसिंहासनी विराजमान झालेली या देवीला अढळपद प्राप्त होवो हीच हृदयस्थ ईश्वराजवळ प्रार्थना.
**********************************
सुंदर ते ध्यान दिसे टिव्ही वरी
मने सोकावली बघण्याला.
मोत्याचे ते दाणे मुखी विलासती
उधळण हास्याची करतसे.
काळे ते कुंतल डोई शोभा देती
मेघमाला जणू बरसती.
शिवानी म्हणती सुर्व्यांच्या लेकीला
अमृताचा ठेवा धरेवरी.
मिक्या म्हणे आता हेच उरे सुख
पाहीन ते रुप आवडीने.
Comments
Post a Comment