छोटासी जख्म नासूर बन जाती है....
स्वातंत्र्य मिळतामिळता बंगालच्या मनावर ओरखडा उठला. स्वातंत्र्य संग्रामात बंगाली लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,पण जेव्हा लाखो बंगाली मायलेकींवर मुस्लिमांकडून अत्याचार केले गेले तेव्हा "आमच्या मदतीला कोणीही आले नाही" हा छोटासा ओरखडा बंगाल्यांच्या मनावर उठला.
स्वातंत्र्य मिळाल्यावर पश्चिम पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या पंजाबी निर्वासितांना त्यांच्या पाकिस्तानात सोडून याव्या लागणाऱ्या मालमत्तेबद्दल नुकसान भरपाई दिली गेली.
पण, पुर्व पाकिस्तातून स्वतंत्र भारतात येणाऱ्या बंगाली निर्वासितांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. हे कृत्य म्हणजे बंगालच्या ताज्या जखमेवर भारत सरकारने टाकलेला मसालाच होता.
तेव्हापासूनच बंगाली लोकांचा ओढा चीनकडे वाढू लागला.पश्चिम बंगालचा नरक बनला.कॉलेजमधली लोक टाईमपास म्हणून बस जाळू लागली,आपण सुतळी बाँब विकत घेतो तेवढ्या सहज तिथे बाँब तीथे मिळू लागले.बंगालचा सत्यनाश झाला.
महाराष्ट्र नेहमीच सर्वांच्या मदतीला धावला पण आज महाराष्ट्र पुरात गटांगळ्या खात असतात केंद्र किंवा दुसरी कोणती राज्य मदतीला आले नाही. ही जखम मराठी माणसांच्या मनावर झालेली आज दिसतेय.
कलम ३७० ची भिंत जमीनदोस्त केली गेली पण माणसांच्या मनात उभ्या राहीलेल्या भिंतींचे काय ? पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला पण महाराष्ट्र कर्नाटक यांच्यात उभी राहलेली भिंत भक्कम पणे उभी आहे.महाराष्ट्रातील जनता ही आपलेच बांधव आहेत हा विचार कर्नाटक सरकारने करुन धरणाचे दरवाजे उघडले असते तर एवढी गंभीर परिस्थिती उद्भवली नसती असे तज्ञ सांगतात.
Comments
Post a Comment