मी कविता केली,
अगदी चित्रावरती कविता केली,
आधी कविता रागवली
मग चित्रा कावली.
आता ती कविता
स्मृती बाहेर फेकून दिली,
त्यामुळे आनंदी वृत्ती
पुन्हा एकदा उफाळून आली.
ही कला सर्वांनाच साधत नाही.
ही उपासनेची समृद्धी
सगळ्यांच्या आयुष्याला
ज्योती बनून उजळवत नाही.
Comments
Post a Comment