मने,
प्रेशर कुकरची शिट्टी कशी काम करते तुला माहीतच आहे. कुकरमध्ये प्रमाणाबाहेर वाफ कोंडली जावून त्याचा स्फोट होवू नये म्हणून ही शिट्टी.
माणसाच्या मनालापण अशी एखादी शिट्टी बसवली असती तर ? किती सहजतेने कोंडलेले मन मोकळे झाले असते.
पण नीट बघितले तर मनालासुद्धा अशी शिट्टी असतेच. कधी एखादे ठिकाण माणसाच्या मनावरचा ताण कमी करते, कधी एखाद्या माणसाचा सहवास, कधी एखादे हलकेसे स्मित, कधी एखादा फोन कॉल मनावरचा ताण कमी करतो.
काल सहज छोट्या बहिणीशी बोलताना जाणवले, भडाभडा कॉलवरती बोलत होती, जणू गेल्या पाऊण महिन्यात मनात कोंडलेल्या भावनांपासून मुक्त होतेय, हे चक्क जाणवत होते.
खरंच मनाला तणावमुक्त करु शकणारी माणसं, ठिकाणं जपली पाहिजेत, काहीजणं आपल्यासाठी या शिट्टीची भुमिका बजावत असतील तर काहीजणांसाठी आपणही त्याच भूमिकेत असू.
सगळं काही बोलून मोकळं होता आलं पाहिजे. तेवढेच दुसरं बोलत असतान ऐकूनही घेता आले पाहिजे.
यासाठी जास्त कशाची गरज नसते,हवा असतो तो परस्परांवर विश्वास आणि आपुलकी, तेवढी मात्र जपली पाहीजे.
Comments
Post a Comment