Skip to main content

निरर्थकाची डायरी ३

निरर्थकाची डायरी-      
        "कॅरीबॅगेतली कडधान्याची पॅकेट्स काढून त्याच कॅरीबॅगमध्ये भाजी भरुन फ्रीजमध्ये ठेवणे", एवढे सोपे असते का त्वचारोपणाची प्रक्रिया?
किंवा
         "अंड्यांच्या ट्रे मधले नासके अंडे काढून टाकून त्या रिकाम्या जागी दुसरे अंडे ठेवणे", एवढे सोपे असते अवयवांचे प्रतिरोपण?
           व्हॉट्सअप फॉरवर्ड्स वाचून अनेकांचा नक्की असाच समज झाला असणार.
             शरीर बाहेरुन आलेली कोणतीही गोष्ट सहजासहजी स्विकारत नाही, प्रतिकारशक्ती त्याला हाकलून काढायचा प्रयत्न करते.
             आमच्या गावातील नानांची देहदानाची इच्छा असूनही इकडे ती सोय उपलब्ध नाही म्हणून नोंदणी करता आली नाही.
             एटीएस ही कंपनी सर्वात मोठ्या प्रमाणात कृत्रिम त्वचेची निर्मिती करते. वैद्यकीय किंवा इतर कारणांनी लहान मुलांची सुंता केली जाते,त्या छोट्याशा तुकड्यापासून क्रिकेट ग्राउंड एवढी त्वचा निर्माण होते.
              आता काळी बुरशी, पिवळी बुरशी,पांढरी बुरशी यांची चर्चा जोरदार सुरु आहे, काल एकजण तावातावाने म्हणाला, संशोधकांनी सर्वप्रकारच्या बुरशी नष्ट करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहीजे. पण एका बुरशीपासून बनवलेल्या औषधाच्या सहाय्यानेच रोपण केलेल्या अवयवाला विरोध करणारी शरीरातील प्रणाली क्षीण करता येते.
               ज्या देशात साध्या हॉस्पिटल्सची, ऑक्सिजन्सची, बेडसची, मृतांवर अंतिम संस्कार करण्याची सोय नाही, त्या देशात हजारो लोकांचे अवयव पळवून ते योग्य रितीने जतन करण्याची, त्याचे आवश्यक त्या रुग्णावर तातडीने रोपण करण्याची सोय  देशभर,खेडोपाडी आहे याच्यावर तुमचा खरंच विश्वास बसतो ?

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४