मौनातून मोगऱ्याने
दोन सुगंधी शब्द दिले,
त्या शब्दांनाच मी
कविता असे नाव दिले.
अंगणामधला धुंद मोगरा
मनामध्ये गजबजून जातो,
आणि तिच्या केसांमधल्या
श्रावणधारा घेवून येतो.
अजून त्या झुडपामधला
बटमोगरा हळूच हसतो,
आणि माझा पाय हळूच
तिच्या घराकडे पुन्हा वळतो.
काळ्याकाळ्या नागीणीला
मोगऱ्याची भेट वाहतो
आणि तीच्या नजरमधून
चंद्र उगवताना पाहतो.
---- अभय बापट
०१/०५/२०२२
Comments
Post a Comment