पावसानी अंगणात थैमान मांडलेले
कोणीतरी डोईवरती छत्र घेवून धावलेले.
कोपला होताच सूर्य डोईवरचा कधीचा
कोणीतरी सावलीचे झाड होवून आलेले.
सरली होती ऊब अंगातली कधीची
कोणीतरी हळूवार मिठीमध्ये घेतलेले.
पेटला होता अंगार सभोवताला द्वेषाचा
कोणीतरी येवून मनावर फुंकर मारुन गेलेले.
संपत नसतो ओलावा एकाच वेळी जगामधला
कोणीतरी असतेच नेहमी देव म्हणून भेटलेले.
--- अभय बापट
०९/०५/२०२२
Comments
Post a Comment