जगलेल्या प्रत्येक क्षणात मी समाधान शोधत होतो
आनंदाच्या प्रत्येक क्षणात मी नव्याने जगत होतो.
येत होते फुल आनंदाचे क्षणोक्षणी हातात माझ्या
त्या प्रत्येक क्षणाला मी नवा जन्म मानत होतो.
बहरत होती बाग फुलांची कित्येकदा नव्याने
श्वास घेता घेता मी रोज नव्याने बहरत होतो.
सावधपणाच्या हाका कित्येक वेळा आल्या कानी
प्रत्येक हाकेला मी नव्याने प्रतिसाद देत होतो.
काटेरी झाडांचे रान माजते कारण नसताना
अविनाशी राहण्यासाठी पुन्हा पुन्हा झगडत होतो.
------- अभय बापट
१९/०५/२०२२
Comments
Post a Comment