स्वत:कडे त्रयस्थपणे बघता आले पाहीजे.
तरुण मुलांच्यात एका नवीनच अंधश्रद्धा वाढीला लागलेली दिसतेय, "फेसबुकवर पोरी पटतात" अनेक तरुण मुलं फेसबुकवर या उद्देशाने उंडरलेली दिसतात.
त्यांनी स्वत:कडे त्रयस्थ नजरेनी बघितले पाहीजे,आपल्याकडे असे काय आहे की एखाद्या मुलीने आपल्या प्रेमात पडावे. आपल्याकडे शिक्षण,नोकरी-व्यवसाय, संपत्ती,पर्सनॅलिटी असे काय स्पेशल आहे.
स्वप्न बघणं गुन्हा नाही पण ती आपल्या आवाक्यातली असावी, आणि स्वप्नांची बाग फुलवताना खोटेपणाचे पाणी घालावे लागू नये एवढेच.
नाहीतर मग मान खाली घालावी लागते स्वत:ला आणि घरातल्या साध्यासरळ पालकांनाही.
---------अभय बापट
Comments
Post a Comment