कसं सांगू......
तुझ्या मनातील समृद्धी नसतो देवू शकलो
सुखाचा सावली नक्कीच धरली असती,कसं सांगू.
रंगीबेरंगी जग नसतं दाखवू शकलो
रंगीबेरंगी नात्यांचे गाव आंदण दिले असते, कसं सांगू.
माझ्या डोळ्यातील अश्रू बघून परत फिरलीस तू
तुझ्या अश्रूंसाठी रुमाल झालो असतो, कसं सांगू.
उत्कर्षाची ओढ प्रत्येकालाच असते या जगात
समाधानाचे नाणेच खणखणीत वाजते, कसं सांगू.
स्वप्नांच्या भरारीला नसते बंधन आकाशाचे
सत्याच्या घरट्याकडे परतावेच लागते,कसं सांगू.
तू शब्दाच्या आधीचे आणि नंतरचे विरामचिन्ह
तुझे नाव येण्यापूर्वी थांबावे लागते,कसं सांगू.
कसं सांगू म्हणताना खुप काही बोलून गेलो
तुझ्यापर्यंत पोचण्याआधी शब्दांना रोखावे लागते, कसं सांगू.
०७/०५/२०२२
Comments
Post a Comment