जो जगण्याला विटला नाही
असा कोणीही भेटला नाही.
घेतला वसा प्रेमाने वागण्याचा
तो थोडा वेळही टिकला नाही.
धावला प्रत्येकाच्या अडचणीत
स्वत: अडचणीतून सुटला नाही.
काढल्या हजार चुका लोकांच्या
चुकांमधून स्वत: शिकला नाही.
राबला तो आपुलकीच्या ओढीने
खिसा कधी सुखाने भरला नाही.
दिवा धरला हातात सदा लोकांसाठी
पायतळीचा अंधार कधी सरला नाही.
--- अभय बापट
१३/०५/२०२२
Comments
Post a Comment