पुन्हा एकदा सारेजण
एकत्र भेटूया,
विखुरलेल्या आनंदाला
सारे मिळू वेचूया.
पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया.
गप्पाटप्पा आणि गाणी
रुसवेफुगवे याची कहाणी
हरवलेल्या स्वप्नांना
डोळे भरून पाहूया.
पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया.
तू तू मी मी खुप झाले
आता सारे विसरु या
गुंतलेल्या धाग्यातून
पुन्हा मैत्री विणूया.
पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया.
वर्ष सरतील आणि पावसाळे
वादळ वारे आणि उन्हाळे
एकमेकांच्या सोबतीने
आपापले घरटे जपूया.
पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया.
तुमचे आमचे सेम असते
कधी चांदणे कधी ऊन असते
काळोख्या रात्रीकडे
उजेड होवून धावूया.
पुन्हा एकदा सारेजण एकत्र भेटूया.
०२/०५/२०२२
Comments
Post a Comment