नव्या वाटेवर यावा
विज्ञानाचा प्रकाश
अध्यात्माला साथ
विवेकाची.
नव्याने सुरवात
आनंदाचा विचार
माणसांचा आधर
वाटेवर.
समाधानाचा घेवू
हातामध्ये हात
समृद्धीची आस
सर्वांच्या.
संवादाचा सेतू
शब्द संवादू
उंच भरारी
जाणीवांची.
कर्तृत्वाला मिळे
संवेदनांची जोड
श्रमातून स्वप्न
साकारावे
ज्ञान, करुणा धैर्य
त्रिसूत्री जीवनाची
मानवतेचा दीप
उजळवा.
-----अभय बापट
Comments
Post a Comment