आनंदाचा डोह
आपल्या अंतरी,
घेवू या भरुन
सुखाच्या घागरी.
सुखाच्या घागरी
करुया जतन,
समाधानाचे गाणं
गावूया जमून.
गावूया जमून
समृद्धीची गाणी,
राहूया कृतज्ञ
देवाची करणी.
देवाची करणी
जाणू मनोमनी,
ओंजळीनी वाटू
आपुलकीची नाणी.
मी-तू पणाचा
सोडूनीया मोह,
नितळ राखूया
आनंदाचा डोह.
----अभय बापट
१७/०२/२०२६
Comments
Post a Comment