तू म्हणशील तेव्हा
देईन साथ
हातामध्ये हात
पुन्हा एकदा.
तू म्हणशील तेव्हा
सुरांमध्ये सूर
जुळवू स्वर
पुन्हा एकदा.
तू म्हणशील तेव्हा
उभा तूझ्या पाठी
घेवू गाठीभेटी
पुन्हा एकदा.
तू म्हणशील तेव्हा
चालू सोबतीने
लढू सोबतीने
पुन्हा एकदा.
तू म्हणशील तेव्हा
येईन धावून
सावली होवून
पुन्हा एकदा.
तू म्हणशील तेव्हा
होवू एकजीव
भरुया उणीव
पुन्हा एकदा.
तू म्हणशील तेव्हा
मी तूपण सरावे,
आपुलकीने जुळावे
पुन्हा एकदा.
--- अभय बापट
Comments
Post a Comment