Skip to main content

पत्र....माझे मला

प्रिय,
      अभय.
              ‌तुला प्रिय म्हणावे का, चालेल का तुला? आपल्याला आवडत्या व्यक्तीचा उल्लेख आपण प्रिय असा करतो, अरे पण तू तर तुझ्या स्वत:वरच नाराज असशील तर प्रिय म्हणावे तरी कसे ?.
               आयुष्यात काही निर्णय चुकतात, काहीवेळा अनपेक्षित निर्णय घ्यावी लागतात पण हेच तर जीवन आहे.
                मध्यंतरी तूच तर पुस्तक ,"शल्य अधुऱ्या स्वप्नांचे" आणले होतेस, अनेक यशस्वा माणसांना कोणीतरी वेगळेच व्हायचे होते आणि त्यांचे करियर वेगळेच झाले तरी त्यांनी जीव ओतून कष्ट केले आणि यश खेचून आणलेच.
त्यातील अनेकांना तर शुन्यातून सुरवात करावी लागेल.
                  तूला नशीबाने उंच उडायला आयते पंख मिळाले, उंचावर पाय रोवायला भक्कम फांदीचा आधारही मिळाले. तु धडपडलास तर आधारला, सावरायला मदत करणारे हातही तुला नशीबाने तुझ्या आजूबाजूला मिळाले आहेत.
                 आपल्यातीलच एखादी जिद्दीने ४५ व्या वर्षी डॉक्टर होते, ते शिकताना वैमानिकाचे शिक्षण घेते, घोडेस्वारी शिकते. 
                  कोणी भयानक आजारातून सावरुन जिद्दीने नर्मदा परिक्रमा करते. 
                  कोणी मरण निश्चित झाल्यावर चारधाम यात्रा करत पुर्ण करतं.
                  ‌ही अशी आपल्यातीलच उदाहरणे डोळ्यासमोर असताना, नाउमेद होण्याची हिंमत तरी कशी होते रे?
                   काही नवीन शिकायला वय कधीच आड येत नाही, जिद्द परिश्रमाची तयारी असते तर अनंत हात मदतीला तयार असतातच.
                   बघ विचार करा,अजूनही वेळ गेलेली नाही. यश नाहीच मिळाले तरी अनुभव नक्कीच मिळेल आणि हार न मानता प्रयत्न केल्याचे समाधान,आनंद तरी नक्कीच मिळेल, ज्यावर तुझा फक्त तुझाच हक्क असेल.
                    तुर्तास एवढेच......

Comments

Popular posts from this blog

विळखा

आत्ताच मी स्वत:चा आवाज ऐकला आहे कानात हा कुणीसा लाव्हाच ओतला आहे. माजले किती विषारी तण मनात माझ्या माझा जीव त्यांनी पुरता वेढला आहे. झाला विषरी डोह निर्मळ वाहत्या नदीचा डोहात कालीयाने विखार ओतला आहे. विसरुन गेलो होतो स्वत्व मी कधीचा शिवरायांच्या भूमीचा हुंकार ऐकला आहे. चला एकरुप होऊ थोडे तरी मनाने मानवी मनांचा त्यांनी बाजार मांडला आहे. काढून घास मुखीचा जे भरपेट जेवले इथे लाचारास एक तुकडा त्यांनीच फेकला आहे. विसरुन जे गेले इतिहास, शौर्य आपले फुगवून छाती दाखवू , विचार मांडला आहे. होता सुवर्णयुगाचा उजेड आपल्यापाशी  उगाच अंधपणाने अंधार प्यायला आहे. -----अभय बापट ०९/०५/२०२५

कोजागिरी

पौर्णिमेच्या चंद्र ज्योती, चंद्रिकेच्या दुग्ध धारा मंद गंधा वाहूनिया आणितो हा शीत वारा, रात्र ही साखलेली, चंद्र किरणी माखलेली शीत वारा सेवूनीया काया ही सुखावली, आपुलकी...

बाओबाब अलिबाग

माणसांची वृत्ती बदलली, विचार करण्याची  पद्धत बदलली. आजकाल नवीन झाड लावताना माणूस पहिल्यांदा विचार करतो आपल्याला त्याचा उपभोग घ्यायला मिळणार आहे का ?      एका छोट्याश्या अंकुरापासून भलामोठा वृक्ष बनायला शेकडो वर्ष लागतात.      हे आहे अलिबाग पोलिस लाईनमधले चोरचिंचचे/गोरखचिंचेचे/ बाओबाबचे झाड.      शरदिनी डहाणूकर झाडांना सोयरेआप्त म्हणतात आणि गोरखचिंचेचा उल्लेख आपले पुर्वज असा करतात.       पोलिस परेड ग्राऊंड शेजारी असलेला हा महावृक्ष शेकडो वर्ष वयाचा असावा. पोलिस परेड ग्राऊंडवरची छत्रपती शिवाजीराजांचा पुतळा बघून या वृक्षाला महाराजांची आठवण येत असेल का ?कदाचित त्याने त्याच्या तरुणपणी महाराजांना बघितलेही असेल.        सरखेल कान्होजी आंग्रे यांनाही त्याने नक्कीच बघितले असेल.         त्याचा ही ऊर भरुन येत असेल परेड ग्राऊंडवरची तटबंदीची प्रतिकृती बघून, समोर महाराजांना बघून. तो ही हरवून जात असेल इतिहासाच्या रम्य स्मृतीत. ----अभय बापट ११/०६/२०२४