संयम, राधे,
संयम,
बोलला जाणारा प्रत्येक शब्द, घडणारी प्रत्येक घटना टिपकागदावरती पसरणाऱ्या शाईसारखी हळूहळू आपल्या मनावर आपला रंग सोडत असते.
विचारपूर्वक बोलावे राधे आणि विवेकाने चालावे यातच स्वतःसह सर्वाचेच हित असते. प्रत्यक्ष ईश्वराला सुद्धा अवतार घेताना योग्य क्षणाची वाट संयमाने पहावी लागते राधे.
राधे, लोखंडाच्या तुकड्यापासून हत्यार घडवणाऱ्या तो लोहाराचे निरिक्षण कर, संयमाचे अत्युत्तम उदाहरण आहे तो. योग्य तितके लाल होईपर्यंत संयमाने वाट पहात बसावे लागते मग घणाचा एकच घाव, योग्य वेळी,योग्य ठिकाणी, योग्य ताकदीने. तेव्हाच सुबक,धारदार शस्त्र तयार होते.
योग्य क्षणी,योग्य प्रकारे केलेली कृती यश देते राधे, तो क्षण येईपर्यंत वाट पाहणे हाच कर्मयोग.
राधे, संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे,ती वापरला तरच बाकीच्या किल्ल्यांचा उपयोग, नाहीतर शिल्लक राहतात ते निष्फळ पर्यंत.
राधे, शब्द उच्चारण्यापूर्वी,कृत्ती करण्यापूर्वी संयमपुर्वक विचार करावा राधे, नंतर मागे वळता येत नाहीच असे नाही पण कधीकधी त्यामुळे अतोनात नुकसान मात्र होते.
----- अभय बापट
Comments
Post a Comment