तुझ्या डाळींबी ओठांवरची
पाखरं आली भरात,
तुझ्या कोकीळकंठी गळ्यातून
शब्द उलगडती सुरात.
तुझ्या सोनसळी रंगाचे
तेज ऊन्हात नाहते,
तुझ्या हिरव्याकंच यौवनाचे
पिक डौलत डुलते.
तुझ्या काजळी डोळ्यातून
माया अपार सांडते,
तुझ्या काळ्याकंच केसाची
नदी वेगात धावते.
तुझ्या गुलाबी गालांचे
वैभव मनाला लोभवते,
छोट्या खळीच्या वाटीत
अमृत भरुन वाहते.
तुझे रुप मनोहरी
सुगंधाचा ग ठेवा,
तुझ्या कस्तुरी गंधाचा
वाटे निसर्गाला हेवा.
-----अभय बापट
१८/०२/२०२६
Comments
Post a Comment