मनातमध्ये उठणारे शब्द
कंठामध्ये रुतून बसतात,
डोळ्यात येणाऱ्या अश्रूंना
बघणारे चूक समजतात.
मायेने भरलेले डोळे
द्वेषाने गढूळ होतात,
डोळ्यातल्या भावाला
वासनेची भूक समजतात.
आपुलकीनी जपलेले
दुर्लक्षाने दुरावतात,
जोडू पाहणाऱ्यांना
नात्यांची भिक समजतात.
समजवणारे शब्द
अपेक्षेने मार्ग दाखवतात,
चुकणारे मात्र त्यांना
पाठीवरती चाबूक समजतात.
१५/०३/२०२२
Comments
Post a Comment