सोपेच असते तुझे वागणे
सोपेच असते गुंतत जाणे,
सोपेच असते भिजून चिंब
केस पुसूनी मोकळे होणे.
सोपेच असते तुझे हसणे
सोपेच असते शब्द जोखणे,
सोपेच असते गालात हसून
अनोळखी होवून निघून जाणे.
सोपेच असते जीव लावणे
सोपेच असते जपत जाणे,
सोपेच असते सारे पुसून
कोरी पोटी हाती धरणे.
सोपेच असते बहरुन येणे
सोपेच असते वाटून देणे
सोपेच असते नव्या ऋतूला
नव्या पालवीने सामोरे जाणे.
२७/०२/२०२२
Comments
Post a Comment