मी कविता करतो असे नाही
शब्दांशी खेळ करतो असे नाही,
रचतो मनात मी स्वप्नांचे इमले
भावनांना सूर देतो असे नाही.
मी सुख मागतो असे नाही
मी दु:ख झेलतो असे नाही,
चालतो वाटेवरुन एकटाच मी
आनंदासाठी मार्ग शोधतो असे नाही.
मी सोबत शोधतो असे नाही
मी एकाकी जगतो असे नाही,
झुंडीत धावणे नाही मंजूर मला
मी हात झिडकारतो असे नाही.
मी स्वप्न पाहतो असे नाही
मी सत्य नाकारतो असे नाही,
वेचली फुले सुगंधाची जेथे
त्या रोपट्यांना विसरतो असे नाही.
मी विसरुन जातो असे नाही
मी मुद्दाम स्मरतो असे नाही
उगाच घेवून हातात कोळसा काळा
पुन्हा पुन्हा तोच उगाळतो असे नाही.
१५/०३/२०२२
Comments
Post a Comment